मुंबई: वृत्तसंस्था । महाराष्ट्रात काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात काल 6959 रुग्णांची वाढ व 225 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली होती.
लातूर जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने 28 रुग्ण आढळले आहेत , त्यामुळे बाधितांची संख्या 91 हजार 355 वर पोहंचली आहे . आता पर्यंत 88 हजार 782 जणांनी कोरोनावर मात केली आहे . सध्या 163 रुग्ण उपचार घेत आहेत . आता पर्यंत कोरोनाने 2 हजार 410 जणांचा बळी घेतलेला आहे . कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने लोक बाजारपेठेत गर्दी करताना पहायला मिळत आहेत .
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या 5 दिवसात जिल्ह्यात सरासरी दररोज 1 हजार रुग्ण कोरोनाबधित होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात सध्या 5687 रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने संगमनेर, कर्जत आणि पारनेर या 3 तालुक्यात सर्वाधिक रुग्ण बधित होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
इंदापूर तालुक्यात मागील काही महिन्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र होते, याच वेळी तालुक्यात रोज नव्याने कोरोना होणाऱ्यांची संख्या 20 च्या आसपास होती, मात्र सहा दिवसांपासून ही संख्या झपाट्याने वाढली आहे रोज साधारणतः 50 हून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत, इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात तर सध्या बेड शिल्लक नाहीत,
सांगली जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत शनिवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात 843 जणांना कोरोनाचे निदान झाले, तर 886 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील 18 जणांचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसचे नवीन रुग्ण नाही आढळले, तर दोघांचा मृत्यू झाला सरासरी साडेसहाशेवर असलेल्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने चिंता वाढली आहे.
रत्नागिरीतही कोरोनाचे 2074 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासातील कोरोनाचे 256 रुग्ण वाढले आहेत. दररोज 200 हून अधिक रुग्ण सापडत आहेत. जिल्ह्यात रोज 5 हजाराहून अधिक चाचण्या करण्यात येत आहेत. जिल्ह्याचा रिकवरी रेट -93 टक्के असून मृत्यूदर-2.82 टक्के आहे.
सातारा जिल्ह्यातील 675 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मागील 24 तासात 11577 नागरिकांच्या कोरोणा चाचण्या करण्यात आल्या.या पैकी 675 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
नागपुरात आज 4 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद झाली आहे. एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 15 जणांनी कोरोना वर मात केली आहे. नागपूरमध्ये कोरोनानं मृत्यू झालेल्यांची संख्या 10117 वर पोहोचली आहे.