मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज (बुधवार) ३२१ वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईत १६, पुण्यात २ आणि बुलडाण्यात १ नवा करोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे.
राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून आता तो ३२० वर पोहोचला आहे. मंगळवारी राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३०२ एवढी होती. परंतु बुधवारी तो आकडा वाढून ३२० वर पोहोचला. यामध्ये मुंबईत १६ आणि पुण्यात २ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेणारी एक महिला आणि भारती हॉस्पिटलमधील ४१ वर्षीय अंगणवाडी सेविका या महिलेची दुसरी करोना चाचणी देखील निगेटिव्ह आली आहे. या दोघींना पुढील १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईनच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत पुण्यात ९ बाधित रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबई १६७, ठाणे मंडळातील इतर मनपा ३६, पुणे शहर व ग्रामीण ५०, सांगली २५, नागपूर १६, नगर ८, यवतमाळ ४, बुलडाणा 4, सातारा, कोल्हापूर २, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी १ अशी राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या आहे.