Home आरोग्य महाराष्ट्रातील ५३१ पोलीस कोरोनाबाधित

महाराष्ट्रातील ५३१ पोलीस कोरोनाबाधित

0
43


मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील तब्बल ५३१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ५१ अधिकारी आणि ४८० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर पाच पोलिसांना आपले प्राण गमावले आहेत.

 

आजच्या घडीला ४३ अधिकारी आणि ४४४ कर्मचारी कोरोनासंक्रमित आहेत. तर आतापर्यंत ३९ जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये आठ अधिकारी आणि कर्मचारी आहेत. तर मुंबईतील तीन तसेच पुणे आणि सोलापूरमधील प्रत्येकी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांना कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.


Protected Content

Play sound