चिनावलच्या सातपुडा वाईन्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील चिनावल येथील सातपुडा वाईन्स या मद्य विक्री करणार्‍या दुकानदाराने लॉकडाऊनचे उल्लंघन केल्या प्रकरणी दोषी आढळल्याने या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, लॉकडाऊन सुरू असतांना चिनावल येथील सातपुडा वाईन्स मधून अवैध पध्दतीत दारूची विक्री होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या दुकानाची तपासणी केली होती. यात अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. यात तीनदा स्टॉक जुळत नसल्याचे आढळून आले. तर लॉकडाऊन सुरू होण्याआधी व तपासणी करत असतांनांच्या स्टॉकमध्ये विसंगती आढळत होती. या बाबींची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सातपुडा वाईन्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे लेखी आदेश जारी केले आहेत.

Protected Content