पाळधी महामार्ग पोलीस केंद्र येथे हायवे मृत्युंजय दूत उपक्रमाचे उद्घाटन

 

पाळधी ता. धरणगाव, प्रतिनिधी ।  महामार्ग पोलीस केंद्र येथे अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतुन “हायवे मृत्युंजय दूत” या योजनेचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले आहे. 

“हायवे मृत्युंजय दूत” योजनेचे उद्घाटन  नायब तहसीलदार-धरणगाव लक्ष्मण सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभाग एआरटीओ  श्री. देशमुख  , शहर वाहतूक शाखा जळगाव पोलीस निरीक्षक देवदास कुनगर,  पाळधी पोलीस दुरक्षेत्र सपोनि. गणेश बुआ, डॉ. जितेंद्र जैन, ,पाळधी चे मा.सरपंच तथा देशदूतचे पत्रकार अलिम देशमुख, सकाळचे पत्रकार दिपक झंवर,  तलाठी बालाजी लोंढे,, मौलाना आझाद संस्थेचे फिरोज शेख, तसेच स्थानिक नागरीक आणि महामार्ग पोलीस केंद्र पाळधीचे अंमलदार  उपस्थित होते.  हायवे मृत्युंजय दूत या योजनेबाबत उपस्थित मान्यवरांना प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस केंद्र पाळधीचे सुनील मेढे यांनी योजना कशी राबविण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती दिली. तसेच ही योजना चांगल्या प्रकारे राबविण्याकरीता मदत आणि सहकार्य करण्याचे जनतेला महामार्ग पोलीस केंद्र पाळधीतर्फे आवाहन केले आहे. कार्यक्रम आयोजन करण्यासाठी एपीआय  सुनिल मेढे, एनपीसी हेमंत महाडीक, प्रदिप नंनवरे, पंकज बडगुजर दिपक पाटील यांनी मेहनत घेतली, व कार्यक्रम सूत्रसंचालन वसिम मलिक यांनी केले.

 

Protected Content