जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेत अविरतपणे सेवा बजावून सेवानिवृत्त होणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांचा महापौर यांच्या दालनात महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, गटनेते सुनिल महाजन यांच्याहस्ते आज ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता सत्कार करण्यात आला.
सविस्तर असे की, जळगाव महापालिकेत प्रदिर्घ काळ सेवा देणाऱ्या महापालिकेच्या विविध विभागातील एकुण ८ कर्मचारी ३१ जुलै २०२१ रोजी सेवानिवृत्त होत आहे. या निमित्ताने आज शुक्रवारी ३० जुलै रोजी महापालिकेच्या महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यात लिपीक हिरालाल आनंदा सोनवणे, मोकादम अशोक कडू सोनवणे, वाहनचालक अरूण दत्तात्रय सुर्यवंशी, वाहनचालक दिनेश तुकाराम नन्नवरे, नाकेदार गजानन मोतीराम चौधरी, आया कलाबाई प्रकाश सोनवणे, पंप अंटडंट संतोष ढाके आणि वाहन चालक प्रकाश रंगराव पवार यांचा समावेश आहे. या आठही कर्मचाऱ्यांचा महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपाचे गटनेते सुनिल महाजन यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला