जळगाव प्रतिनिधी । महापालिकेच्या मालमत्ता आत्तापर्यंत थकबाकी व सन २०१८-१९ या वर्षीच्या मालमत्ता कराची एकूण मागणी ७१ कोटी ५२ लाख पैकी ४५ कोटी ८० लाखांची ३१ मार्च अखेर चारही प्रभाग समितीत वसुली करण्यात आली आहे. तर केवळ ३१ मार्च रोजी १४ लाख ७९ हजार रुपये मालमत्ता कराचा भरणा करण्यात आला. तर १० लाख ६८ हजार धनादेशाच्या स्वरुपात वसूल करण्यात आले आहे.
मागील वर्षी हीच वसुली ३१ मार्च रोजी ४२ कोटी २१ लाख रुपये होती. मालमत्ता कर एप्रिल महिन्यात भरल्यास १० टक्के सुट दिली जाते. मागील वर्षी एप्रिल महिन्यात ७ कोटी ७९ लाखांचा भरणा करून मालमत्ताधारकांनी ही सूट मिळवली होती. यात प्रभाग १ मध्ये २ कोटी ७७ लाख, प्रभाग २ मध्ये १ कोटी ६ लाख, प्रभाग ३ मध्ये १ कोटी ५९ लाख तर प्रभाग ४ मध्ये १ कोटी ९५ लाखांचा भरणा एप्रिल महिन्यात करण्यात आला होता.