महापालिकेतर्फे नालेसफाईस प्रारंभ

जळगाव, प्रतिनिधी । महापालिका प्रशासनातर्फे दरवर्षी पावसाळापूर्वी नालेसफाई मोहीम राबविली जाते. यंदा दि. १५ एप्रिलपासून नालेसफाई मोहिमेला सुरुवात झाली असून त्याचा प्रारंभ दूध फेडरेशन ते सत्यम पार्क कानळदा नका येथून करण्यात आला असल्याची माहिती सहायक उपायुक्त पवन पाटील यांनी दिली.

महापालिकेतर्फे प्रथम शहरातील ६८ उपनाले स्वच्छतेचे काम आरोग्य विभागाने तीन जेसीबीच्या मदतीने सुरू केले आहे. शहरात २३ किमी. लांबीचे पाच मोठे नाले आहेत. यात मेहरूण ते ममुराबाद, मानराज मोटर्स ते खेडी, रामदास कॉलनी ते चंद्रप्रभा कॉलनी, समता नगर ते दीपक फूड्स, इकबाल कॉलनीतील नाल्यांचा समावेश आहे या पाच प्रमुख नाल्यांसह ६८ उपनाल्यांच्या सफाईची मोहीम महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी केली जाते. या नाल्यामधील सर्व गाळ व कचरा काढून नाल्याचा प्रवाह मोकळा करण्यात येतो. जून महिन्यात पावसाळा सुरू होत असल्याने नालेसफाईचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. यात शहरातील पाच प्रमुख नाल्यांच्या सफाईसाठी प्रभाग निहाय निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  तर ६८ उपनाल्यांच्या साफसफाईकरीता बांधकाम, पाणीपुरवठा व आरोग्य विभागाकडील जेसीबींद्वारे करण्यात येत आहे. दरम्यान, आज लक्ष्मी नगर येथे नाले सफाईची महापौर भारती सोनवणे, सहायक उपयुक्त पवन पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक कुंदन काळे व श्री. किरंगे यांनी पाहणी केली.

Protected Content