महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू केल्याचे आदेश उप सचिवांनी काढले आहेत. थकीत फरक हा  पाच टप्प्यात देण्यात येणार आहे.

 

महापालिकेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा या मागणीसाठी मनपा कर्मचारी समन्वय समितीतर्फे  पाठपुरावा करण्यात आला. आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर भारती सोनवणे, विद्यमान महापौर जयश्री महाजन यांनी सकारात्मक भूमिका घेवून शासनाकडे पाठपुरावा केला. समन्वय समितीत उदय पाटील, अरविंद भोसले, सुशिल साळुंखे, एस.एस.पाटील, राजेंद्र पाटील, विलास सोनवणी, बाळासाहेब चव्हाण, सुनील गोराणे, दिनानाथ भामरे, संजय अत्तरदे, नरेंद्र चौधरी, शरद बडगुजर, चंद्रकांत वांद्रे, अनिल पाटील, वसंत सपकाळे, लक्ष्मण सपकाळे, डॉ.विकास पाटील, सुहास चौधरी, चंद्रकांत सोनगिरे आदींचा समावेश आहे. या समितीने आमदार राजूमामा भोळे, आजी-माजी महापौरांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश येवून  मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत नगरविकास विभागाचे उप सचिव शंकर जाधव यांनी आदेश काढले आहेत.  सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे मनपा कर्मचार्‍यांमध्ये आनंद व्यक्त केला आहे. शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यास व प्रत्यक्ष वेतन १ जानेवारी २०२१ पासून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. महापालिकेने आर्थिकस्थिती विचारात घेवून २०१६ ते २०२० या कालावधीतील थकीत फरक पाच टप्प्यात देण्याची दक्षता घेण्याबाबतचे आदेशात नमुद केले आहे.

 

 

 

Protected Content