जळगावात फ्रुटस् दुकानावर चोरट्यांचा डाव; 55 हजारांचा ऐवज लंपास

chori news

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पेठ हद्दीतील बंद दुकान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून गल्ल्यातील 55 हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुकानदाराकडून मिळालेली माहिती अशी की, विजय भावलाल चौधरी वय 47 रा. पौर्णिमा बंगला कोल्हे नगर यांचे जिल्हा पेठ हद्दीत गुजराथी गल्लीतील वाणी मंगल कार्यालयाजवळ श्री. निहारीका फ्रुटस् चे दुकान आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री उशीरा दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्री 3 ते पहाटे 5 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश करत गल्ल्यातील 55 हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे एकजण लोखंडी ग्रील वाकवून आत प्रवेश केला तर दुसरा बाहेर उभा होता. गल्ल्यातील रक्कम काढत बाहेर उभा असलेल्या भामट्याकडे देत होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अजित पवार करीत आहे.

Protected Content