खामगाव प्रतिनिधी । स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांकडून सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद केल्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
मागील पाच वर्षांपासून महापरीक्षा पोर्टल द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये संभ्रमित अवस्था निकालांमध्ये होणारे दिरंगाई यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमिवर, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वच विद्यार्थी सरकारचे मन:पूर्वक स्वागत करीत आहेत. त्याप्रमाणे सरकार म्हणत असल्याप्रमाणे शेतकरी चिंतामुक्त करण्यासाठी त्यांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच तालुकास्तरावर शेतकरी पुत्र अभ्यासिका हा उपक्रम राबवावा ही सर्व मागणी आता करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी पुत्र अभ्यासिका हा उपक्रम चालू करण्यासाठी आवश्यक असणार्या सर्व बाबी उपलब्ध आहेत.या सर्व बाबींचा विचार करून सरकारने निर्णय घेतला तर शेतकरी हिताचा बरोबरच विद्यार्थ्यांचे हित पण साधले जाईल.. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा चिंतामुक्त होईल.
महापरीक्षा पोर्टल बंद निर्णयाचे स्वागत करण्यासाठी व संपूर्ण कार्यक्रमासाठी नांदुरा येथील कॉटन मार्केट संचालक राजेश गावंडे, मंगेश राऊत, निशा तायडे,अश्विनी सरकटे ,पौर्णिमा लांडे ,मुक्ता डिवरे, आशना भिडे,विजय हिवरखेडे, निकिता राऊत, विवेक जाधव ,महेश चोपडे ,अनंता झालटे, निखिल खराबे, हेमंत महाजन व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी उपस्थित होते.