धरणगाव (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये नुकतीच ‘ बालसभा ‘ उत्साहात संपन्न झाली. यावेळी राष्ट्रपिता क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक इ.६वी ची विद्यार्थीनी रूपाली सरदार हीने केले. याप्रसंगी बालसभेच्या अध्यक्षस्थानी इ.६ वी ची विद्यार्थीनी ऋतुजा वाघमारे होती. प्रमुख अतिथी म्हणुन शाळेच्या जेष्ठ शिक्षीका पी.आर. सोनवणे, एम.के. कापडणे , श्रीमती.व्ही.पी. वऱ्हाडे, मराठी विषय शिक्षक पी.डी.पाटील, हेमंत माळी, व्ही.पी. महाले, सी.एम.भोळे, एस.एन.कोळी हे होते.
उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले , संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर ऋतुजा वाघमारे हीने सौ. सोनवणे मॅम यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. व विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर इ.६ वी ची विद्यार्थीनी कु.भारती गायकवाड , चि. अनुग्रह जाधव , चि. लोकेश पाटील , कु. रूपाली सरदार या मुलांनी राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवना कार्यावर प्रकाश टाकला. शेवटी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करून बालसभेला पुर्णविराम दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अर्चना भोई हीने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी विषय शिक्षक पी.डी.पाटील व वर्ग ६ वी च्या मुलां – मुलींनी सहकार्य केले.