Home राजकीय केजरीवालनंतर ओवेसीही हनुमान चालीसा म्हणताना दिसतील : योगी आदित्यनाथ

केजरीवालनंतर ओवेसीही हनुमान चालीसा म्हणताना दिसतील : योगी आदित्यनाथ

0
45


yogi aaditynath
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ येते आहे तसं अरविंद केजरीवाल हनुमान चालीसा गाताना दिसत आहेत. एक दिवस असा येईल ज्यादिवशी असदुद्दीन ओवेसीही हनुमान चालीसा म्हणताना दिसतील, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

 

दिल्लीत आप विरुद्ध भाजपा असा लढा आहे. आज अरविंद केजरीवाल यांच्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीकास्त्र सोडले आहे. अगदी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही निशाणा साधला आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ येते आहे तसे अरविंद केजरीवाल हनुमान चालीसा गाताना दिसत आहेत. एक दिवस असा येईल ज्यादिवशी असदुद्दीन ओवेसीही हनुमान चालीसा म्हणताना दिसतील,असे योगी यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता ओवेसी या टीकेला काय प्रतिउत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


Protected Content

Play sound