जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशांमध्ये दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेल, गॅसच्या वाढत्या दरवाढीच्या विरोधात आणि अग्निपथ योजनेच्या विरोधात जळगाव शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवनासमोर महानगराध्यक्ष श्यामकांत तायडे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
केंद्रातील चुकीच्या धोरणामुळे देशांमध्ये दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेल, गॅसच्या वाढत्या दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंवर लावलेल्या जीएसटीमुळे सर्वसामान्य माणसाला जीवन जगणे मुश्कील झाले आहे. तसेच घाईघाईत चालू केलेल्या भारतीय सैन्यदलातील अग्निपथ योजनेमुळे युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या सर्व विषयासंदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विरोध नोंदवित आहे. दरम्यान या निर्णयावर बदल करावेत. निर्णयात बदल न झाल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटील, महानगराध्यक्ष श्यामकांत तायडे, दीपक सोनवणे, प्रदीप सोनवणे, जगदीश गाडे, जाकीर बागवान, सुधीर पाटील, सखाराम मोरे, अजमल शहा, मिराबाई सोनवणे, अण्णा जाधव, मुजिम पटेल, गणेश राठोड, विशाल पवार, योगिता शुक्ल, रमजान तडवी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.