जळगाव : प्रतिनिधी । खाद्यतेल , पेट्रोल , डिझेल , स्वयंपाकाचा गॅस दरवाढीमुळे भडकलेली महागाई रोखण्यासाठी सय्यद नियाज अली मल्टिपर्पज फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवले आहे.
या निवेदनात म्हंटले आहे की , आधीच प्रदीर्घ काळापासून सामान्य जनता , मध्यमवर्गीय आणि गरीब लोक लॉक डाऊनमध्ये भरडले गेले आहेत . या काळात कामधंदे ठप्प झाल्याने त्यांनी बचत केलेली जमापुंजी आता संपलेली आहे त्यातच खाद्यतेल , पेट्रोल , डिझेल , स्वयंपाकाचा गॅस दरवाढीमुळे भडकलेली महागाई रोखण्याऐवजी सरकारने या दरवाढीवर काहीच नियंत्रण ठेवलेले नाही सातत्याने सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत त्यामुळे राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून सरकारला या वस्तूंचे दर कमी करण्यास भाग पाडावे त्यासोबतच हातावर पोट असलेल्या लोकांना सरकारकडून मदत देण्याचे आदेश राष्ट्रपतींनी सरकारला द्यावेत. यावेळी फाउंडेशनतर्फे मोटरसायकल व गॅॅस सिलेंडरला पुष्पहार घालून निषेध करण्यात आला.
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना पाठवलेल्या या निवेदनावर अय्याज अली नियाज अली , शेख शफी , शेख सालिमोद्दीन , मोहम्मद खान , सलमान शेख , शेख इलियास , शेख अब्दुल , ए एम शेख , हाशिम कुरेशी , तन्वीर अहमद , शेख नाजीम आदींच्या सह्या आहेत.
https://www.facebook.com/508992935887325/videos/465562414515563