मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काशी महाकाल एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या एक्स्प्रेसमध्ये एका सीटला मंदिराचे स्वरुप देण्यात आले असून भगवान शंकराची मूर्ती ठेवण्यात आली आहे. एक्स्प्रेसच्या B-5 या डब्यात 64 नंबरची सीट महादेवासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी ते मध्य प्रदेशच्या इंदूरपर्यंत या ट्रेनचा मार्ग असेल. ही रेल्वे इंदूरजवळ ओंकारेश्वर, उज्जैनमध्ये महाकालेश्वर आणि वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ या तीन ज्योतिर्लिंगांना जोडणार आहे. भगवान शंकरासाठी B-5 या डब्यात 64 क्रमांकाचे आसन राखीव ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे महादेवासाठी सीट राखीव ठेवल्यानंतर ट्रेनमध्ये ‘भोले बाबा’साठी एक सीट कायमची आरक्षित ठेवण्याबाबत रेल्वे प्रशासन विचार करत आहे.