महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यासाठी उपोषण (व्हिडिओ )

 

जळगाव,  प्रतिनिधी । माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता, विजय दोधा पाटील, डॉ. सरोज पाटील व शिवराम पाटील यांनी आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

महसूल प्रशासनातील अनागोंदीच्या विरोधात दुसऱ्या टप्प्यात अहमदनगर येथील थोरातांचे संपर्क कार्यालय आणि मुंबईतील काँग्रेस कार्यालयासमोरही आमची उपोषणाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल खात्यातील गैरव्यवहाराबद्दल बोलताना या उपोषणकर्त्यांनी सांगितले कि नागपूर प्रशासकीय न्यायाधिकरणाने नुकताच निकाल दिला कि, कोणतीही तक्रार नसलेल्या ,कार्यकाळ पुर्ण न झालेल्या ४० उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्या महसूलमंत्री थोरात यांनी केल्या.त्या बदल्या नागपूर मैट हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवल्या.वैयक्तिक स्वार्थासाठी पदाचा गैरवापर करून महाराष्ट्र गव्हर्मेंट सर्व्हंटस रेग्युलेशन आणि ट्रान्सफर एक्ट २००५ चे उल्लंघन केलेले आहे. महसूलमंत्री थोरात यांच्या सहीने झालेल्या बदल्यांच्या विरोधात नागपूर प्रशासकीय विभागातील ४ उपजिल्हाधिकारी आणि ८ तहसीलदारांनी मैट मधे धाव घेतली होती.

या बदल्या करू नयेत असे स्पष्टपणे नागरी सेवा मंडळाने महसूल विभागाला कळवले होते. तरीही थोरांतांनी या बदल्या केल्याच कशा? याचे उत्तर जनतेला दिलेच पाहिजे. नाहीतर थोरात हे जनतेची,सरकारची फसवणूक करीत आहेत म्हणून राजीनामा द्यावा असेही ते म्हणाले .

या उपोषणकर्त्यांनी प्रमुख भूमिका सांगितली कि सेनापती त्याच्या सेनेच्या विजय आणि पराभवाला सारखाच जबाबदार असतो हे आम्ही जगाला सांगायची गरज नाही जळगाव येथील तहसीलदार वैशाली हिंगे या २०१३ मधे भुसावळचे तहसीलदार असताना शिंदी येथील इनामी जमीन विल्हेवाट करण्यासाठी १९लाख ५७ हजा ५०० रुपये नजराणा बुडवला. त्यासाठी त्यांनी कलेक्टर चे आधिकार परस्पर वापरले अशी तक्रार भुसावळचे प्रांताधिकारी यांनी जळगाव कलेक्टरकडे केली आहे. हा नजराणा बुडवला कि गटवला? याचे उत्तर महसूलमंत्री म्हणून थोरातांनी दिलेच पाहिजे.

नजराणा बुडवणाऱ्या तहसीलदार वैशाली हिंगे यांच्यावर थोरात कारवाई का करीत नाहीत? काही देणेघेणे झाले आहे काय? याचे उत्तर थोरातांनी जनतेसमोर द्यावे.अन्यथा राजीनामा द्यावा. वैशाली हिंगे या २०१३ मधे भुसावळ येथे तहसीलदार पदावर असताना २’६५५ शिधापत्रिका मधे अपहार केल्याची तक्रार नाशिक महसूल विभागीय आयुक्त यांनी १२-८-२०१५ रोजी महसूल मंत्रीकडे केली आहे.त्यावर अद्याप कारवाई केलेली नाही.

पाणंद रस्ते योजने अंतर्गत भडगाव तालुक्यातील ३३ रस्त्यांसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी ३३ लाख रूपये भडगाव चे तहसीलदार माधुरी आंधळे यांच्या नावे ट्रेझरीत टाकले.परंतु तहसीलदाराने रस्ते न बनवता खोटे दस्तावेज जोडून शेत पाणंद रस्यांचा निधी अपहार केला.ही बाब महसूलमंत्री थोरातांच्या निदर्शनास आणून दिली.तरीही थोरातांनी तहसीलदार माधुरी आंधळे यांच्याकडून वसुली केली नाही.कारवाई केली नाही. बदली केली नाही.
जिल्ह्यातील गौण खनिज आधिकारी दिलीप चव्हाण यांनी कोरे परमीट जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन, बांधकाम विभागाला दिलेत.तेथील कार्यकारी अभियंता नाईक यांनी खोटी माहिती लिहीलेले परमीट दप्तरी जोडून मक्तेदाराला कामाचे बील पेमेंट अदा केले .त्यात रॉयल्टी भरल्याचा उल्लेख नाही. इनव्हाईस नंबर नाही. मुरुम ,दगड वाहाण्यासाठी दुचाकी,तिनचाकी वाहने वापरल्याची नोंद आहे. एकाच वाहनचालकाने एकाच वेळी दहा वाहने चालवण्याचा उल्लेख आहे.पाचोरा तहसीलदाराचा बोगस शिक्का उमटवलेला आहे. परमीट खालील सही खाली गौण खनिज आधिकारीचे नांव नाही. तारीख नाही. असे कोरे परमीट दिलेच कसे? महसूल खात्याने रॉयल्टी बुडवली आहे.

थोरात कांग्रेस प्रदेश अध्यक्ष पदावरून पक्षासाठी काम करीत आहेत.हा शासकीय मानधन, वाहन,सेक्युरीटी याचा गैरवापर होत आहे. एकतर पुर्णवेळ मंत्री म्हणून काम करावे किंवा मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेचे काम करावे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/409418586736725/

Protected Content