*जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |* – महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय्य प्रलंबित मागण्यांसंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतू शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुकास्तरीय महसूल कर्मचाऱ्यांनी प्रलंबित विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय राज्यस्तरीय संप पुकारण्यात आला.
महसूल कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्या शासनस्तरावर आहेत. या मागण्यासाठी आतापर्यत दोन टप्यात आंदोलने करण्यात आली आहेत. शासनाने कर्मचाऱ्यांच्या न्याय्य प्रलंबित मागण्यांसंदर्भात कार्यवाही न केल्यास संघटनेच्या आंदोलनाची रुपरेषा निश्चीत करण्यात आली असून महत्वाच्या तिसऱ्या टप्यानुसार जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आज २८ मार्च रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला.
या लाक्षणिक संपाच्या अनुषंगाने सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच तालुका स्तरावर तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येऊन संघटनेतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे योगेश नन्नवरे, रविंद्र उगले, अतुल जोशी, संदीप गवई, गणेश हटकर, योगेश पाटील, नूर शेख, सुरेश महाले, महिला प्रतिनिधी प्रिया देवळे, रेखा चंदनकर, अनिता पाटील, सुनंदा पाटील, रेखा कुलकर्णी तसेच महसूल कर्मचारी संघटना तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.