Home क्राईम मस्कावद येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

मस्कावद येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
77

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मस्कावद येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, रावेर तालुक्यातील मस्कावद येथील १५ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मुलगी व तिचे कुटुंबिय हे मध्यप्रदेशातील खंडवा येथील रहिवाशी आहे. कामाच्या निमित्ताने ते मस्कावद परिसारात राहतात. १० जानेवारी रोजी रात्री १० वाजता सर्वजण घरात झोपलेले असता अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार ११ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आला आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात नातेवाईकांना धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार हे करीत आहे.


Protected Content

Play sound