मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आला आहे आणि त्यामुळे मलिक यांच्याकडील असलेल्या कॅबिनेट मंत्रीपदासह मुंबई अध्यक्ष व अन्य जबाबदाऱ्या काढून घेण्यात आल्या आहेत. मलिक यांच्याकडील कौशल्य, रोजगार ची जबाबदारी आरोग्य मंत्री राजेश टोपेंकडे तर अल्पसंख्याक मंत्री पदभार जितेंद्र आव्हाडांकडे सोपविण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री नबाब मलिक यांच्यावर सक्त वसुली संचालनालय कडून कारवाईत अटक करण्यात आली आहे. दरम्यान नवाब मलिक यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आला आहे आणि त्यामुळे मंत्री मलिक यांच्याकडील खात्यांची कामे थांबू नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. यात मलिक यांच्याकडील असलेली दोन्ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर दोन मंत्र्यांकडे देण्यात आली. तर गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही काढून घेण्यात आली असून गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची तर परभणीचे पालकमंत्री पदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांचेकडे देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या कॅबिनेटची बैठकित शिफारस
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत अधिसूचना जारी केलीय. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना नवाब मलिक यांच्याकडील खात्यांचा कार्यभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांकडे देण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार राज्यपालांनी मलिक यांच्याकडील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तर अल्पसंख्याक मंत्रीपदाचा कार्यभार राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाऐवजी दोन कार्याध्यक्ष
मुंबईचे राष्ट्रवादीचे अध्यक्षपद नवाब मलिकांकडे असून आगामी काळातील मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेता, मलिक हे मुंबईचे अध्यक्ष असून जामीन मंजूर नसल्याने ते उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक करणार असल्याचे तसेच पक्ष संघटनेची येणाऱ्या निवडणुका आणि अन्य सर्व गोष्टींची हाताळणी, आमचे हे दोन कार्याध्यक्ष नवाब मलिक यांच्यासमवेत करतील असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.