जळगाव, प्रतिनिधी : येथील औद्योगिक वसाहत परिसरातील हस्ती नगरात मरुधर रेसिडेन्सी परिवारतर्फे सामाजिक व धार्मिक एकोपा जपत, स्वयंस्फुर्तीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.
यंदा परिवाराचे श्री गणेश स्थापनेचे चौथे वर्ष आहे. परिवारातर्फे इको फ्रेंडली शाडू मातीच्या गणेशाची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. सजावटीसाठी मखर, भिंत, पडदे स्वत: शिवून त्यावर छोटे आरसे, मोती, लोकर, गोंडे अशा वस्तू६ वापरीत महिला वर्गाने कलाकुसरी केली आहे. अपार्टमेंट, वसाहत म्हटले तर सहसा एकमेकांचे जमत नाही व संवादही खूप कमी असतो. त्याठिकाणी एकत्र कुटुंब जीवनशैलीप्रमाणे मात्र मरुधर रेसिडेन्सी परिवार हा दरवर्षी विविध कार्यक्रम सलोख्याने राबवीत आहे. यात सामाजिक बांधिलकी जोपासत नवरात्र, स्वातंत्र्यदिन, भजनसंध्या, जन्माष्टमी, होळी, विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक खेळ व पारितोषिक वितरण यांचा समावेश आहे. दररोज १२ दिवस भंडारा आयोजित असून एका परिवारातर्फे परिसरातील सुमारे १०० पेक्षा अधिक जणांना महाप्रसाद दिला जात आहे.
मंडळाचे समन्वयक राजकुमार अग्रवाल असून सदस्य मनिष चोरडिया, सी.डी.मिश्रा, रामप्रकाश गुप्ता, अरुण बाफना, सुभाष डागा, महेश बन्सल, संजय छाजेड, मुकेश वाघमारे, अनुराग जैन, पियुष बोरा आहेत.