मराठी प्रतिष्ठानतर्फे पिंक ऑटो रिक्षा प्रशिक्षणाचा शुभारंभ

autorikshaw trenning

जळगाव, प्रतिनिधी | येथील मराठी प्रतिष्ठानतर्फे सात महिलांच्या रिक्षा प्रशिक्षणाचा शुभारंभ आज (दि. २८) दुपारी ३.०० वाजता सागर पार्क येथे करण्यात आला.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या उपस्थितीत महिलांना प्रशिक्षण देण्याची सुरवात झाली.

 

मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, उपाध्यक्ष विजय वाणी, सचिव सतीश रावेरकर, महिला आघाडी अध्यक्ष सौ. अनुराधा रावेरकर, विश्वस्त सौ. निलोफर देशपांडे, सौ संध्या वाणी, सौ संगीता पाटील व प्रशिक्षण घेणाऱ्या महिला उपस्थित होत्या.

कुशल ऑटोचे संचालक विद्याधर नेमाने यांनी नवीन रिक्षा प्रशिक्षण देण्याकरिता उपलब्ध करून दिली. नूर शेख हे सर्व महिलांना प्रशिक्षण देत आहेत.बँक ऑफ बडोदाचे शाखाधिकारी विकास कात्यायाल, युनिअन बँकेचे शाखाधिकारी तुषार सूर्यवंशी यांच्या बँकांचे आर्थिक सहाय्य देणार आहेत.

Protected Content