इंद्रप्रस्थ नगरातून एकाची सायकल लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगरातून एकाची सायकल चोरून नेल्याची घटना समोर आली. याप्रकरणी दुपारी एका वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, प्रविण प्रकाश बाविस्कर (वय-४३) रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ५ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० ते ६ सप्टेंबर सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर लावलेली सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. सर्वत्र शोध घेवून सायकल मिळाली नाही. त्यामुळे बुधवारी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहे.

Protected Content