जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दैनंदिन जीवनात समाजात घडणाऱ्या घटनांना पत्रकार आपल्या लेखणीतून निर्भीडपणे मांडत असतो. वृत्तपत्र ते मोबाईल पत्रकारिता असे पत्रकारिताचे स्वरूप आज बघावयास मिळत आहे. मात्र हे करीत असतांना तठस्थ भूमिका घेऊन समाजाधिष्टीत पत्रकारिता करणे ही काळाची गरज आहे. असे विचार मूळजी जेठा महाविद्यालयाच्या रेडिओ मनभावनचे समन्वयक अमोल देशमुख यांनी मराठी पत्रकारिता दिनानिमित्त रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी केसीई सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी व जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभाग प्रमुख प्रा. संदीप केदार, सुभाष तळेले,चंद्रकांत कोळी, प्रा. केतकी सोनार, संजय जुमनाके, आरजे स्वामी , समृद्धी पाटील,राहुल पाटील उपस्थित होते.
इंग्रज सरकारच्या जुलूम व अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या मराठी वृत्त पत्रातून केलेले परखड लिखानाचे पडसाद ब्रिटिश सरकारला दिसत होते.इंग्रजी व मराठी भाषेतील दर्पण हे निर्भीड आणि निष्पक्ष असे मराठी वृत्तपत्र होते असे विचार प्रा. संदीप केदार यांनी मांडले.