चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मराठा महासंघ आणि माझी वसुंधरा अभियानच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने हिरापूर रोड प्रभाग क्र १० मधील दत्त मंदिर महावीर कॉलोनी परिसरातील खुल्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले.
मराठा महासंघ आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन निकम, माझी वसुंधरा अभियानच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण सामाजिक कार्यकर्ते , माजी नगरसेवक व अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारीच्या वतीने करण्यात आले.महासंघाचे सल्लागार नामदेव तुपे यांच्या खुल्या मैदानावर वृक्षारोपण केले पाहिजे, या त्यांच्या संकल्पनेला मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या उत्साहाने पुढाकार घेतात आणि सामाजिक उपक्रम, महापुरुषांच्या जयंती साजरी करतात. यानुसार रविवार दि. १७ जुलै रोजी हिरापूर रोड प्रभाग क्र १० मधील दत्त मंदिर महावीर कॉलोनी परिसरातील खुल्या मैदानावर मराठा महासंघाचे चाळीसगाव शहर सल्लागार नामदेवराव तुपे, ज्येष्ठ सदस्य गुलाबराव पाटील, चाळीसगाव शहराध्यक्ष खुशाल बिडे, शहर उपाध्यक्ष संजय पाटील, मराठा महासंघाचे सदस्य हिरामण मांढरे, वसंत काळे यांच्या प्रयत्नातून आणि माझी वसुंधरा अभियानच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सचिन आव्हाड, माजी नगरसेवक सदाशिव अप्पा, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मराठे, माजी नगरसेवक चंद्रकांत तायडे यांच्या हस्ते व मराठा महासंघाचे पदाधिकारी यांचे वतीने करण्यात आले . यावेळी परिसरातील नागरिक भैय्या देवरे, निशांत गायकवाड, वडनेरे काका, प्रा. कांबळे सर,पुंडलिक माळी, अनिल गवळी, मनोज सोनार, मेजर विजय पाटील, नितीन शिंदे व परिसरातील नागरिक व नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.