मनीष जैन नाथाभाऊंना भेटले

 

 

 

जळगाव : प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांची आज माजी आमदार मनीष जैन यांनी भेट घेतली . या भेटीमुळेही आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . या भेटीचा तपशील मात्र लगेच समजू शकला नाही .

 

जिल्ह्याच्या राजकारणात जैन आणि खडसे हे आतापर्यंत एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी होते . किंबहुना त्यांच्यात राजकीय शत्रुत्व होते असे म्हंटले जाते एकनाथराव खडसे यांचे पुत्र स्व. निखिल खडसे यांचा विधान परिषद निवडणुकीत मनीष जैन यांनी पराभव केला होता . तर रक्षा खडसे यांनी लोकसभा निवडणुकीत मनीष जैन यांचा पराभव केला होता . जिल्ह्याच्या राजकारणातील ही दोन टोके आता बदलत्या परिस्थितीत बदलत आहेत . ईश्वरलाल जैन हे जिल्ह्यात बराच काळ शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते .

आता नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर बरीच राजकीय समीकरणे बदलत आहेत या पार्श्वभूमीवर त्यांना मनीष जैन यांनी भेटायला जाणे महत्वाचे मानले जाते आहे . जामनेरात गिरीश महाजन यांना अडचणीत आणण्यासाठी तर ही भेट नव्हती ? ; असाही अन्वयार्थ या भेटीचा काही जण लावत आहेत ,

Protected Content