पाचोरा, प्रतिनिधी । मनिषा वाल्मिकी प्रकरणाची सी.बी.आय.चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन पिपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गटातर्फे तहसिलदार व प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की, उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील मनिषा वाल्मिकी बलात्कार प्रकरणी सी.बी.आय.चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मुस्लिम, धनगर, आणि मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे, बेरोजगारांना व शेतकरी यांना उद्योगासाठी कर्ज न देणाऱ्या, बँक मॅनेजरांवर घटनात्मक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, कोळी समाजास जातीचे प्रमाणपत्र मिळणेबाबत. कोरोनामध्ये शेतकरी, कामगार, ओ.बी.सी.एस.सी,एस.टी.विरोधी आरक्षण रद्द करण्याचे कारस्थान थांबवावे. आरक्षण बंद करून, खाजगीकरण लागू करणारे कायदे बंद करण्यात यावे. योगी सरकार व मोदी सरकार यांची पत्रकारांवरची व दादागीरी थांबवण्यात यावी.
तसेच दि. ९ रोजी काशिराम स्मृती दिनानिमित्त पाचोरा रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. हे रेल रोको आंदोलन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ०५:३० वाजता अभिवादन करून मोर्चा ला सुरवात करण्यात येईल, व पाचोरा रेल्वे स्टेशन वर कामयानी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०७१ थांबवण्यात येणार आहे. अश्या आशयाचे निवेदन पिपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गट पाचोरा यांनी तहसीलदार प्रांताधिकारी, पाचोरा स्टेशन पोलिस निरीक्षक अनिल शिंदे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष खंडू सोनवणे, गणेश सुरवाडे, दिपक दांडगे, सुमीत खर्चाणे, शुभम बावीस्कर, विकास थोरात, सिध्दार्थ मोरे, वाल्मिक जाधव, गौतम धिवरे, दिपक ब्राम्हणे, अनिल गायकवाड, राज खैरनार, आकाश ब्राम्हणे, लिलाधर खैरनार, चंद्रकात जगताप उपस्थित होते.