जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिला दिनाचे औचित्य साधून युवती सभेतर्फे सोमवारी तरुणाई आणि बांधिलकी ’ याविषया वर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
जीवनात जर तरुणांना यश संपादन करायचे असेल आणि त्याचे व्यक्तित्व विकसित करायचे असेल तर ते सामर्थ्य मनाच्या शांततेत दडलेले आहे. पण त्याचबरोबर तरुणांनी आपले कार्य बांधिलकी व निष्ठेतून केले तर त्यांना जीवनात यश हे निश्चित मिळेत हे करत असतांना मनाची शांतता ढवडू न देणे यांतून विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते. त्याचा आत्मविश्वास व्दिगुणित होतो. त्याचे चौफेर व्यक्तित्व विकसित करण्याचे सामर्थ्य हे मनाच्या शांततेत दडलेले आहे व ते खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचे औषध आहे. असे प्रतिपादन प्रमुख अतिथी अॅड. महिमा मिश्रा यांनी मू.जे.महाविद्यालयातील युवती सभेच्या ‘ तरुणाई आणि बांधिलकी’ याविषयावर बोलताना केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सं.ना. भारंबे हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय युवती सभा प्रमुख डॉ.रोशनी पवार यांनी केले तर सूत्रसंचालन दिव्या थायडे या विद्यार्थीनी ने केले. आभार डॉ. योगिनी राजपूत यांनी मांडले. या कार्यक्रमात डॉ.भारती तळेले, प्रा.देवेश्री सोनवणे, डॉ.संगीता पाटील व प्रा. विजय लोहार उपस्थित हे होते