औरंगाबाद (वृत्तसंस्था) शिवसेनेनंतर आता मनसेनेही तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार औरंगाबादमध्ये मनसे १२ मार्चला छत्रपत्री शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत: उपस्थितीत राहणार आहेत.
मनसे हिंदूत्वाचा नारा देत भगवा झेंडा हाती घेतला आहे. त्यानुसार आता औरंगाबादमध्ये मनसे तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार आहे. येत्या १२ मार्चला मनसेकडून शिवजयंतीच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. तिथीनुसार शिवजयंती करण्याच्या या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.