यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील दोन ज्येष्ठ शेतकर्यांनी अत्यंत अवघड समजली जाणारी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असुन त्याचे गावातील मंडळी कडुन वाजत गाजत बैलगाडी मिरवणूक काढुन त्याचे स्वागत करण्यात आले.
संतोष दौलत पाटील (वय ६५) आणि सेवानिवृत्त एस.टी.कर्मचारी दगडु वना पाटील या शेतकर्यांनी अत्यंत खडतर समजली जाणारी नर्मदा परिक्रमा साडेतीन महिन्यात पुर्ण पायी पूर्ण केली आहे. दगडु पाटील लहानपणापासूनच पांडुरंगाचे निस्सिम भक्त. रोज न चुकता ते सकाळ, संध्याकाळ गावातील मंदिरात विठुरायाच्या दर्शनाला जातात. वीस वर्षांपासून त्यांच्या घरी संध्याकाळचा हरिपाठ नित्यनेमाने अखंडित चालूच आहे. त्र्यंबकेश्वर व पंढरपूरची वारीदेखील ते न चुकता करीत आहेत. अतिशय शांत, मनमिळावू स्वभावाचे धोंगडे बाबा मनी कुठलीही अपेक्षा न ठेवता परमेश्वराची भक्ती करीत आहे.
तर संतोष पाटील गावातील सर्वाशी मनमिळाऊ व्यक्ती असुन गावातील कोणत्याही धार्मिक कामात सहभागी होतात. स्वामी श्री रेवांनद गुरु केशवांनद धुनीवाले दादाजी यांचे भक्त आहे. आयुष्यात एकदातरी अतिशय कठीण समजली जाणारी नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा त्यांच्या मनी होती. त्यांनी ती ७२व्या वर्षी पूर्ण केली. इच्छाशक्ती व भक्तीच्या जोरावर त्यांनी नर्मदा परिक्रमेचा ३५०० कि.मी.चा पायी प्रवास त्यांनी साडे तीन महिन्यांत पूर्ण केला.
साधारणत: ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो. यांनी रोज चाळीस ते पन्नास किलोमीटरचा पायी प्रवास करून नर्मदा परिक्रमा साडे तीन महिन्यात पूर्ण केली. ही यात्रा पूर्ण केल्यानंतर आल्यानंतर त्याच्या स्वागत करण्यासाठी योगराज जुलालसिंग पाटील यांची नवी बैलजोडी घेऊन गाडयावर बसवून मनवेल चे भरपूर भक्तगण धुनीवाले दादाजी प्रवेशद्वाराजवळ उपस्थिती होते. त्यांनी वाजत गाजत,भंजनी मंडळी ने भजने म्हणत, जंगी स्वागत करण्यात आले.
प्रथम मानकेश्वर महादेव मंदीर वर जाऊन तेथे नर्मदा मैय्याचे जल चढवण्यात आले. यानंतर सुभाष अशोक पाटील व पन्नालाल हुकुमचंद पाटील यांनी शाल श्रीफळ व हार पुष्प गुछ देऊन सत्कार केला. तेथुन पुढे गावात प्रवेश करताना घरोघरी ह्या परिक्रमा भक्तगण ची पुजा आरती करण्यात आली.हनुमान मंदिरात जाऊन चरणावर नर्मदा जल अर्पण केले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मध्ये नर्मदा जल चरणावर अर्पण केले,ह्या भक्तगणाचे हारपुष्प देऊन श्री पुरुषोत्तम धैर्यसिंग पाटील यांनी स्वागत केले. श्री दादाजी दरबार मध्ये धुनि प्रज्वलन करून दरबार मधील महादेव वर नर्मदा जल अर्पण केले. त्यानंतर नर्मदा मैय्या ची आरती केली गेली.