यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील मनवेल येथील आदीवासी आश्रमशाळेत भारतीय संविधान दिन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्राथमिक शिक्षिका उज्ज्वला पाटील हे उपस्थित होत्या. तत्पूर्वी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरम्यान संविधानाची निर्मिती कशी झाली याबाबत शिक्षक राकेश महाजन यांनी सांगून संविधानाचे स्वरूप , वैशिष्टये विशद केली. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच २६ / ११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माध्यमिक शिक्षक राजेश भारुळे यांनी आभार मानले.
यावेळी अधीक्षक वसंत पाटील , अधीक्षिका सरीता तडवी , शिक्षक विजय चव्हाण , सुभाष पाटील , नितीन चौधरी , कैलास बेलदार , कमलाकर इंगळे , राजू पावरा , मोहीत अत्तरदे , महंमद तडवी , दिपक ढाके , भाऊसाहेब नारायण पाटील , संदीप पाटील व विदयार्थी उपस्थित होते.