मनवेलच्या महिलेचे घरकुल अनुदान थांबविले : जगन सोनवणे यांचा आंदोलनाचा इशारा

यावल,  प्रतिनिधी ।  तालुक्यातील मनवेल गावात एका विधवा व निराधार महिलेच्या रमाई घरकुल योजने अंतर्गत मंजूर  होवुन बांधकाम सुरु असलेल्या घरकुलाचे अनुदान सरपंच व इतरांनी थांविल्याने असल्याचा आरोप करून  हे अनुदान मिळाले नाही तर शुक्रवार ४ जून पासून पंचायत समिती समोर विविध स्वरुपात आंदोलन करण्याचा इशारा  पिपल्स रिपब्लीकन पार्टी ( प्रा. जोगेन्द्र कवाडे सर )चे महामंत्री जगन सोनवणे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

 

या संदर्भात प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी म्हटले आहे की , यावल तालुक्यातील मनवेल येथील राहणाऱ्या मंगलाबाई रामदास इंधाटे या विधवा व निराधार महिलेचे रमाई या योजनेअंतर्गत घरकुल मंजुर झाले आहे.  असे असतांना मात्र घरकुलाचे बांधकाम अर्ध्यावर आलेले असतांना ग्रामपंचायतीचे सरपंच जयसिंग देवराम सोनवणे आणि ग्रामसेवक यांनी सार्वजनिक मुतारीच्या विषयावरून काही ग्रामस्थांच्या तक्रारी झाल्याने अखेर या घरकुलाचे बांधकाम बंद झाल्याने उर्वरीत मिळणारे अनुदान रुपाचे हफ्ते थांबविल्याने हे कामबंद  करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. याबाबत सदर मंगला सोनवणे या विधवा व निराधार महीलेने पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे महामंत्री जगनभाऊ सोनवणे यांच्याकडे आपल्याला घरकुलांचे उर्वरीत हफ्ते व ग्रामपंचायतीने काम बंद पाडल्याची तक्रार केल्याने आज सोनवणे हे यावल येथे पंचायत समितीच्या कार्यालयात येवुन त्यांनी विस्तार अधिकारी के. सी. सपकाळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या  निराधार महीलेच्या मंजूर झालेल्या रमाई घरकुल योजनेचे लाभ मिळवण्यासाठी होत असलेल्या मानसिक त्रास व अडचणीबाबतची कल्पना दिली.   तात्काळ या महीलेचे  घरकुलाचे उर्वरीत हफ्ते व बांधकाम सुरू न झाल्यास आपण शुक्रवार दि. ४ जुन रोजी १o विविध संघटनाच्या माध्यमातून ‘ताला ठोको आंदोलन’ करणार तसेच सोमवार  दि. ७ जुन रोजी दुपारी २ वाजता यावल पंचायत समिती समोर ‘हल्लाबोल आंदोलन’ व गुरुवार दि. १० जुन रोजी सुमारे २०० स्त्री पुरुषांचे आमरण उपोषण’ करणार असल्याचा इशारा त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

Protected Content