मनमाड मतदान प्रक्रियेत इव्हीएममधु उमेदवाराचे नाव गायब

 

नाशिक, वृत्तसंस्था । राज्यात १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरु झालेली असतांना नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये ईव्हीएम मशीनमधून उमेदवाराचे नावच गायब झाल्याचा प्रकार उघड झाला  आहे. या प्रकाराने मनमाडमध्ये खळबळउडाली आहे.

 पानेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सकाळी सुरुवात झाली. पण ईव्हीएम मशीनवरुन उमेदवारांचे नावच गायब झाल्याचे दिसून आले. वॉर्ड नंबर 2 मधील उमेदवाराचे नाव गायब ईव्हीएम मशीनमधून गायब झाले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने वॉर्ड 2 मधील मतदान प्रक्रिया थांबली. घडलेल्या या प्रकारानंतर प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. ईव्हीएम मशीन दुरुस्तीचे काम सुरू आहे.

तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील सडोली खालसा येथे ईव्हीएम यंत्र बंद पडले आहे. प्रभाग क्रमांक 2 चे ईव्हीम मशीन बंद झाले आहे. मशीनची चाचणी घेताना सिग्नल न आल्याने प्रकार लक्षात आला.द रम्यान, राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होतंय. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून ग्रामीण भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे.

Protected Content