जळगाव, प्रतिनिधी । शहरातील विकास कामांकरीता विविध योजने अंतर्गत राज्य शासनाने वितरीत केलेल्या निधीतून करण्यात येणार्या कामांना शासनाने स्थगिती दिली होती. त्यातील ठराविक कामांवरील स्थगिती उठविण्यात आली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला होता. १०० कोटींपैकी ४२ कोटींच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरु केली होती. मात्र शासनाने विकास कामांकरीता दिलेल्या निधीतून करावयाच्या कामांना स्थगिती दिली होती. त्यामुळे विकासकामांना ब्रेक लागला होता. दरम्यान,शासनाने ठराविक कामांची स्थगिती उठविली असल्याचे मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. शासनाने स्थगिती उठविल्यामुळे आता विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. शहराच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून शहरात गटारी,नाल्यांची संरक्षण भिंत,मोकळ्या जागांचा विकास,जाँगींग ट्रक,ओपन जिम असे कामे केली जाणार होते.मात्र शासनाने स्थगिती दिल्यामुळे १०० कोटींतून एक रुपयाही खर्च झालेला नव्हता. आता मात्र स्थगिती उठविण्यात आली आहे.