संचारबंदी : धरणगावात नियम धुडकाविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

धरणगाव,प्रतिनिधी । शहरात कोरोना विषाणूच्या संसर्ग होऊन नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण फिरणाऱ्या मोटारसायकल स्वारांवर, माक्स न लावणारे, सोशल डिस्टन न ठेवणारे , नगरपालिकेच्या वतीने १० ते २० जणांवर आज मंगळावर २१ रोजी कारवाई करण्यात आली . याकारवाईस दुपारी १२ वाजेपासूनया सुरुवात करण्यात आली. या कारवाईचे शहरातील नागरीकांनी स्वागत केले आहे.

संपूर्ण देशात कोव्हीड१९ कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, तसेच धरणगाव तालुक्याच्या हद्दीला लागुन असलेल्या अमळनेर तालुक्यात देखील या कोरोनाचा रूग्ण आढळल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून व वेळोवेळी नागरीकांना समजावून सांगितले असता ही मोटरसायकलस्वार व नागरिक एैकतनसल्यामुळे मंगळवार रोजी दुपारी १२ वाजता जिवनाअवश्यक वस्तू चे दुकान उघडताच नागरिकांनी व मोटरसायकलस्वारांनी एकच गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टंसिंग चा विसर पडल्याने गोंधळ उडाला. नगरपालिकेच्या वतीने लाऊंडस्पिकर वर वेळोवेळी आव्हान करूनही नागरीक एैकत नसल्या मुळे धरणगाव उड्डाण पुलाजवळ धरणगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जनार्धन पवार यांच्या आदेशावरून वरिष्ठ लिपिक संजय मिसरकर, निरीक्षक प्रणव पाटील, जयेश भावसार , राजेंद्र महाजन, अनिल पाटील, भगवान मिस्तरी, निलेश वाणी, सिकंदर पवार, विनोद रोकडे, बबलू चौधरी, दिपक वाघमारे यांनी पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात आली. यात १० ते २० जणांवर कारवाई करून ५००० रूपये दंड वसूल करण्यात आला धरणगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जनार्धन पवार यांनी सांगितले की, आपल्या हाकेच्या अंतरावर म्हणजेच अमळनेर तालुक्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढल्याने आपली जबाबदारी वाढली असून आता आपल्याला ही जास्त खबरदारी घ्यावी लागणार आहे, तसेच शहरातील नागरीकांना ही सावध व जागरूक राहावे लागणार आहे, तसेच शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन धरणगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जनार्धन पवार यांनी केले आहे.

Protected Content