जळगाव प्रतिनिधी । महापालिकेच्या सुप्रिम कॉलनी परिसरातील शाळा क्रमांक १९ व शाळा क्रमांक ३२ मध्ये मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी अचानक पहाणी केली. यावेळी शाळेत मोठ्याप्रमाणात अस्वच्छता आढळून आली असून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असल्यामुळे उपायुक्त अजित मुठे यांनी मुख्यध्यापकासह शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
सुप्रीम कॉलनीमधील मनपाच्या शाळांमध्ये मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शाळेत मोठ्याप्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. शाळेच्या आवारातून नाल्याचे पाणी वाहत असून यामुळे दुर्गंधी पसरत आहे. मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी अचानक पहाणी केली असता शाळांमधील दयनिय अवस्था दिसून आली. ही दयनिय अवस्था मुख्यध्यापकाच्या हलगर्जीपणामुळे झाली आहे. त्यामुळे शाळा क्रमांक १९ व ३२ च्या मुख्यध्यापकांवर कारवाई करण्यात आली असून शिक्षकांना देखील कारणे दाखवा नोटीसा बजाविण्यात आली आहे.