मध्य प्रदेश पोलिसांची चौकी अंतुर्ली फाट्याजवळच्या महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर हलवली

 

 

मुक्ताईनगर : प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील अंतुर्ली फाट्याजवळची मध्य प्रदेश पोलिसांची चौकी  महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर हलवली आहे त्यासाठी बर्हाणपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना खासदार रक्षा खडसे यांनी सूचना केली होती

 

कोरोना बंदोबस्तामुळे मध्यप्रदेश शासनाने लावलेल्या पोलीस नाक्यावर मुक्ताईनगर येथील रुग्णालयातून घरी जात असतांना अंतुर्ली येथील ६ दिवसाचे नवजात बाळ व सिझर शस्त्रक्रिया झालेल्या महिलेला दवाखान्याची कागदपत्र दाखवल्यावरसुद्धा मध्यप्रदेश पोलिसांनी थांबवून गाडीच्या खाली उतरवून त्रास दिला. मुक्ताईनगर येथून अंतुर्ली परिसरात जाण्यासाठी ईच्छापूर मार्गे राष्ट्रीय महामार्ग हा मुख्य रस्ता असून मध्यप्रदेश पोलिसांनी लावलेल्या नाक्यामुळे परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे.

 

खासदार रक्षाताई खडसे अंतुर्ली येथे द्वारदर्शनासाठी जात असतांना त्यांना हा प्रकार लक्षात आला असता त्यांनी तत्काळ  बुऱ्हानपूरचे जिल्हाधिकारी प्रविण सिंग यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत ही  गोष्ट लक्षात आणून दिली  नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती देऊन तत्काळ सदर पोलीस चौकी मध्यप्रदेश हद्दीत हलविण्याचा आदेश दिला  त्यानंतर ती पोलीस चौकी हलविण्यात आली.

 

मागील वर्षीसुद्धा या  पोलीस चौकीमुळे अंतुर्ली येथील नागरिकास जीव गमवावा लागला होता तेव्हा संतप्त  नागरिकांनी तत्काळ  पोलीस बंदोबस्त नाका हटविण्यासाठी आंदोलन केले  खासदार रक्षाताई खडसेंनी प्रत्यक्ष आंदोलना ठिकाणी जाऊन जिल्हाधिकारी बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्र राज्य सिमेत असलेला नाका शाहपूर रस्त्यावरील शिरसोदा फाट्यावर हलविण्यात आला होता. परंतु आता पुन्हा तपासणी नाक्यामुळे परिसरातील ये-जा करणाऱ्या समस्त नागरिक, शेतकरी व वाहन धारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने सदर नाका मध्यप्रदेश हद्दीत हलविण्यात आला असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

Protected Content