आदिवासी महिला कर्मचाऱ्याला अमानुष मारहाणीचा एकलव्य संघटनेतर्फे निषेध

पाचोरा, प्रतिनिधी । महसुल विभागात तलाठी या पदावर कार्यरत असलेल्या आदिवासी महिला कर्मचारी यांना अमानुष मारहाणीप्रकरणी एकलव्य संघटनेतर्फे निषेध करण्यात आला, याबाबतचे निवेदन पाचोरा प्रशासनास दिले.

निवेदनात असे म्हटले आहे की, महसुल विभागात तलाठी या पदावर कार्यरत असलेल्या निशा पावरा ह्या तहसिलदार यांच्या आदेशान्वये अवैद्य गौण खनिज वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करणाऱ्या पथकासोबत आपले कर्तव्य बजावत असतांना तेथील भा. ज. पा. नगरसेवक गौरव चौधरी याचे वाळुने भरलेल्या ओव्हरलोड ट्रक पकडुन तलाठी निशा पावरा यांनी विचारले की रॉयल्टी आहे का ? असे विचारल्याने व वाळुची गाडी अडवली त्याचा राग आल्याने गाडीचा मालक गौरव चौधरी व त्याच्या काही गुंड साथीदारांनी निशा पावरा यांना मारहाण करुन जमीनीवर खाली पाडुन जातीवाचक, अश्लिल शिवीगाळ केली. म्हणुन संबंधीत गुंड प्रवृत्तीच्या लोकांनावर एका महिला कर्मचारीवर अत्याचार केल्यामुळे अनुसुचित जाती, जमाती कायदा अंतर्गत कारवाही करण्यात यावी. तसेच साथरोग अपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. व शासकीय कामात अडथळा निर्माण केला व अवैध वाळु चोरी केल्याने मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करुन संबंधीत महिला आदिवासी कर्मचाऱ्याला न्याय मिळावा. अशा आषयाचे निवेदन तहसिलदार कैलास चावडे व पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना देण्यात आले आहे.

यावेळी पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ, पाचोरा तालुका अध्यक्ष गणेश वाघ, उपाध्यक्ष रोहीदास जाधव, युवा जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनवणे, भडगाव तालुका अध्यक्ष संजय सोनवणे, युवा विद्यार्थी आघाडी प्रमुख कैलास सोनवणे, शाखा अध्यक्ष (परधाडे) रमेश ठाकरे उपस्थित होते.

Protected Content