यावल : प्रतिनिधी । तालुक्यातील न्हावी शिवारात काल मध्यरात्री गस्तीवर असलेल्या महसुलच्या पथकाने गौण खनिज बेकायंदा वाहतुक करणारे डंपर जप्त केले
या कारवाईमुळे ग्रामीण परिसरात वाळु माफीयाव्दारे रात्रीची वाहतुक वाढली असल्याचे दिसुन येत आहे. महसुल प्रशासनाकडुन मिळालेली माहीती अशी की , ३ जुलैरोजी रात्री ११ , ४५ वाजेच्या सुमारास न्हावी गाव शिवारात महसुल प्रशासनाचे पथक गस्तीवर असतांना एम .एच .१९ झेड ३७३० क्रमांकाच्या डंपरमधुन वाहनचालक बंटी सोनवणे ( फैजपुर ) यांच्या मालकीच्या डंपर मधुन विनापरवाना बेकायद्याशीर गौण खनिज वाळुची वाहतुक करतांना यावल विभागाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी , यावल भागाचे शहर तलाठी ईश्वर कोळी, कोळवद गावाचे तलाठी संदीप गोसावी , परसाडे तलाठी सामिर तडवी, कोरपावली तलाठी मुकेश तायडे यांनी यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डंपर जप्त केले भितीने एकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचे कळते
यावेळी महसुल प्रशासनाच्या वतीने फैजपुर तालुका यावल पोलीस स्टेशनला डंपर पुढील दंडात्मक कारवाई करीता जमा करण्यात आले आहे .