मधुकर साखर कारखाना कामगारांच्या हक्कासाठी मनसेचे आमरण उपोषण

यावल,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मधुकर साखर कारखाना लवकरच भाडे तत्वावर द्यावा या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांनी मसाकासमोर आमरण उपोषण आजपासून आरंभले असून मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात याव्यात अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष व मसाका चेअरमन यांना करण्यात आली आहे.

 

शेतकरी व कामगारांच्या विचार करून जिल्हा बँक अध्यक्ष व संचालक तसेच मसाका संचालक योग्य निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. हा कारखाना त्वरीत भाडेतत्वावर दयावा व हा तिढा कायमाचा संपवून पुर्ण हा मार्गस्त करावा अशी मागणी केली आहे. यावेळी जिल्हा बँकेने लवकरच निविदा प्रक्रिया करावी. सरकारने निविदा काढून मंजुरी देण्यात यावी. कामगारांचे देणे लवकरच अदा करावी. न्यायालयीन कामासाठी ठोस निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांची देणी एफआरपी लवकर द्यावी. २५ वर्ष भाडे करारावर कारखाना द्यावा. सेवा निवृत्त कामगार यांच्या नातेवाईकांना कामावर घ्यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या उपोषणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे शहर उपाध्यक्ष किशोर नन्नवरे, विद्यार्थी सेनेचे गौरव कोळी, अजय तायडे, अनिल सपकाळे सहभागी झाले आहेत. मनसेच्या या मसाकाला वाचविण्यासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणास कामगार संघटना व शेतकऱ्यांचा पाठींबा मिळत आहे.

Protected Content