रावेर प्रतिनिधी । जिल्ह्यात फक्त दोन गावांच्या काही शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली असून आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती शिवाय महाविकास आघाडीने कोणतेही काम केले नसल्याचा घणाघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांनी रावेर मध्ये केला.
भाजपाचे राज्यस्तरीय धरणे आंदोलन असुन यामध्ये सहभाग घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष जावळे रावेरात आले होते. यावेळी त्यांनी सरकारवर टिका करतांना पुढे म्हणाले, सर्वत्र महिला असुरक्षित आहे. आज अनेक ठिकाणी सुरू असलेल्या कामांना स्थगिती दिली आहे. मतदारांचा विश्वासघात करून निर्माण झालेले सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचे सूचक इशारा यावेळी त्यांनी दिला.
यावेळी जि.प. अध्यक्ष रंजना पाटील, कृउबा समिती सभापती महाजन, माजी जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि.प. सदस्य कैलास सरोदे, नंदाताई पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, पं.स. सभापती जितेंद्र पाटील, उपसभापती पी.के. महाजन, भाजपा जिल्ह्या उपाध्यक्ष पदमाकर महाजन, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पं.स. सदस्य योगिता वानखेडे, जुम्मा तडवी, कविता कोळी, शिवाजीराव पाटील, सरचिटणीस महेश चौधरी, वासुदेव नरवाडे, नगरसेविका शारदा चौधरी, शहराध्यक्ष दिलीप पाटील, उमेश महाजन, मनोज श्रावग, संजय माळी, संदीप सावळे, भास्कर बारी, सि.एस पाटील आदी तालुकाभरातील भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठे संखने उपस्थित होते.