जळगाव प्रतिनिधी । व्हाट्सॲपवर सट्टा मटका जुगाराचे आकडे घेणार्यांवर डिवायएसपीच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत तिन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे साडेसहा हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील शामा फायर समोरील अब्दुल हमीद चौकात काही युवक व्हाट्स ऊॅपवर सट्टा मटका नावाचा जुगाराचे आकडे घेत असल्याची माहिती डिवायएसपी कुमार चिंथा यांना मिळाली. त्यांनी तात्कळा पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आतिष पाटील, किरण धनके, राजेंद्र मारोतीराया यांचे पथक तयार केले. या पथकाने पानटपरीच्या आडोशाला तीन जण मोबाईलवर सट्ट्याचे आकडे घेत असल्याचे दिसताच त्यांनी सोमवारी दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास याठिकाणी धाड टाकली.
धाडीत त्या तिघांची विचारपुस केली असता त्यांनी शेख आसीफ शेख अन्वर (३५) रा. बिलाल चौक तांबापूरा, हनिफ शेख नजीर (६०) रा. जोशीवाडा, नासिर खान मन्सूर खान (४०) असे नावे सांगीतली असून त्यांच्याकडून मोबाईलसह सुमारे ६ हजार २३० रुपयांचा ऐजव हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेंद्र मारोतीराया यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.