मजूराच्या घरातून सोन्याचे दागिने व रोकडची चोरी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील खडका भागातील एका तरुणाच्या घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून येण्याचे समोर आले आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुतांझीर शेख मेहमूद (वय-२९) रा. मुस्लिम कॉलनी बडी खानका जवळ, भुसावळ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. ११ जानेवारी रोजी दुपारी २ ते १२ जानेवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान त्याचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने रोकड असा एकूण ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील जोशी करीत आहे.

 

Protected Content