चोपडा प्रतिनिधी । येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन देऊन स्थलांतरीत मजुरांच्या हाल थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दि.१९ रोजी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी व जनविरोधी धोरणाविरुद्ध निदर्शने करण्याचा आदेशानुसार भाकप च्या वतीने देशव्यापी निदर्शनांचा भाग म्हणून चोपडा तहसील कार्यालयास १२ मागण्यांचे निवेदन तहसीलदार गावित यांना सादर करण्यात आले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँ अमृत महाजन कॉ.राजेंद्र पाटील निताई बाला ( प बंगाल) कन्हैयालाल( उ त्तर प्रदेश)हिराबाई सोनवणे छाया पाटील मालू बाई पाटील यांचा समावेश होता.
निवेदनात मागण्या केल्या आहेत की ..देशात सर्वाधिक फटका स्थलांतरित व प्रवासी कामगारांना व गरीब,शोषित, पीडित जनतेला बसला आहे. स्थलांतरित मजुरांचे सर्वाधिक हाल होत असून रस्ते अपघात व रेल्वे रुळावर शेकडो मजुरांचे जीव गेलेले आहेत. काही कुपोषणाने मरत आहे, काही भुकेने मरत आहेत. मजूर व कामगार वर्गाचा लॉक डाऊन च्या काळात रोजगार कामधंदा पूर्णपणे बुडाला आहे. त्याला उपजीविकेचे कोणतेही साधन नाही.त्यामुळे हे मजूर आता त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित होत आहेत. त्यांना जाण्यासाठी रेल्वे बसची सुविधा करा जोपर्यंत सोय होत नाही तोपर्यंत जेवणाची व्यवस्था करा या मागण्या यात करण्यात आलेल्या आहेत. यासोबत, सर्वसामान्य माणसाला संकट काळात तातडीने ७५००/-,मदत द्या . सरकार कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल करीत आहे ते कारस्थाने बंद करा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला खिळखिळी करण्यात येऊ नये,मनरेगा अंतर्गत मोहिदा नग्ल वाडी मजुरांना कामे द्या, शहरी ग्रामीण भागात रोजगार आणि निवारा याची हमी द्या, कोणत्याही अटी अथवा नवीन नियमा शिवाय प्रत्येक गरजुला राशन देण्यात यावे.ग्रामीण भागातील गरीब लोक आणि शेतकरी मजूर टपरीधारक छोटे व्यापारी यांचे पतपेढी कर्जे माफ करा. दिलेल्या आश्वासनं नुसार सर्व गॅस धारकांना संपलेला गॅस भरून द्या. ग्रामपंचायत आशा अंगणवाडी कंत्राटी कामगार यांना १४ व्य वित्त आयोगाने प्रोत्साहन भत्ता द्या. वृद्ध,विधवा,आणि अपंग व्यक्तींना दर्जा १०००/- रु प्रमाणे तीन महिन्यांचे पेन्शन ध्या . महाराष्ट्र सरकारचा जी एस टी परतवा द्या. आदी मागण्या या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, तहसीलदार गावित यांनी चर्चेत या आठवड्यात शेतमजुरांची मांधने मिळतील तसेच मनरेगा खाली मजुरांना कामे प्रस्ताव पंचायत समितीला पाठवत असल्याचे सांगितले. तर साडी व्यवसाय करणारे ११ बंगाली व एका युपीच्या व्यक्तीला नगरपालिका १ वेळ जेवण देते तर दुसरे जेवण अरूणभाई गुजराथी यांच्यातर्फे देण्यात येणार असल्याची माहिती कॉम्रेड महाजन यांनी दिली.