जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । असंघटीत कामागारांचे प्रश्न सोडविण्यासाठी व जानजागृती करण्यासाठी मजदूर चेतना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रोतून कामगारांच्या हिताचे प्रश्न सोडविले जाणार आहे. या अनुषंगाने भारतीय मजदूर संघाच्या वतीने बी.जे. मार्केट येथील कार्यालयात गुरूवारी १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली.
राज्यातील कामगारांच्या प्रश्नांवर, कामगारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने मजदूर चेतना यात्रेचे ६ नोव्हेंबर ते २१ नोव्हेबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. शिवनेरी किल्ल्याहून निघालेली ही यात्रा २१ जिल्हे व १२५ तालुक्यातून प्रवास करत आहे. राज्यातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा, बांधकाम व घरेलू कामगारांसाठी ज्या योजना आहे. त्याची अंमलबजावणी करा, किमान वेतन, बोनस, पगार वाढ, कामावरून कमी करणे अशा समस्या आणि तक्रारींवर कोणताही निर्णय घेतला जात नाही. ओरीसा व हरियाणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील कामगारांना कायम करण्याचा निर्णय घ्यावेत. अंगणवाडी सेविकांना माधन वाढवा यासह इतर समस्या घेवून कामगारांमध्ये जागरूकता निर्माण होण्याकरीता ही मजदूर चेतना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या योजना लागू झाल्यास राज्यातील ४९ लाख कामगारांना फायदा होणार आहे. या यात्रेचा शेवट २१ नोव्हेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे.
या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष ॲड. अनिल ढुमणे, प्रदेश मंत्री मोहन येणुरे, प्रदेश सचिव विशाल मोहिते, पक्षाचे विभागीय संघटक सुनिल सोनार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.