मुंबई वृत्तसंस्था । राज्यातील ठाकरे सरकारने अनलॉकची नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीत अनेक गोष्टींना शिथिलता देण्यात आली आहे. अगदी उद्यापासून मेट्रो रेल्वेही सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, धार्मिकस्थळं सुरू करण्यास अद्यापही परवानगी देण्यात आली नाही.
धार्मिकस्थळे सुरू करण्यासाठी भाजपसह विविध पक्ष-संघटनांनी केलेलं आंदोलन केलं होते. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही धार्मिकस्थळे सुरू करण्यासाठी राज्य सरकारला सूचना केल्या होत्या. त्यावरून मुख्यमंत्री-राज्यपालांमध्ये लेटरवॉरही झाला. मात्र, तरीही धार्मिकस्थळे सुरू न करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.