फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | येथील मधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या विषयावर मंत्रालयात झालेल्या ऑनलाईन बैठकीत बैठकीत चेअरमन शरद महाजन देखील सहभागी झाले होते. यात मंत्री समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा व मंजुरीनंतर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया वेगात सुरू होईल अशी माहिती चेअरमन शरद महाजन यांनी दिली आहे.
याबाबत वृत्त असे की, गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला मधुकर सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत सापडला होता त्यानंतर कारखाना व आसवनी प्रकल्प भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव समोर आला होता. अलीकडेच झालेल्या कारखान्याच्या सर्वसाधारण बैठकीत याला मंजुरी प्रदान करण्यात आली होी.
जळगाव, औरंगाबाद व त्यानंतर साखर आयुक्त पुणे यांच्या शिफारशी नंतर भाडे तत्त्वाचा प्रस्ताव मंजुरी साठी मंत्री समितीसमोर दाखल झाला होता या अहवालावर बुधवारी मंत्रालयात ऑनलाइन झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली त्यामध्ये कारखान्याची सद्य आर्थिक स्थिती व अन्य बाबींवर ही सखोल चर्चा झाली या बैठकीला समितीचे प्रमुख सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री शंभूराजे देसाई, साखर आयुक्त शेखर गायकवाड तर कारखान्यातर्फे चेअरमन शरद महाजन, व्हाईस चेअरमन भागवत पाटील, संचालक नरेंद्र नारखेडे कार्यकारी संचालक एस आर पिसाळ यांनी सहभाग नोंदविला. या बैठकीत चेअरमन शरद महाजन देखील सहभागी झाले होते मंत्री समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा व मंजुरीनंतर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया वेगात सुरू होईल अशी माहिती चेअरमन शरद महाजन यांनी दिली
राज्यातील या कारखान्या संदर्भातही चर्चा
दरम्यान, या बैठकीत मधुकर सहकारी सारखर कारखान्याच्या सोबतच राज्यातील आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना गडिंग्लज (कोल्हापूर) तसेच फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना हुपरी (कोल्हापूर) येथील जवाहर शेतकरी कारखान्याला पंधरा वर्षाकरिता भाडेतत्वावर देण्यासंदर्भात ही चर्चा झाली.