अमळनेर: धार्मिक कार्यक्रमासोबतच सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करत मंगळग्रह मंदिराने आतापर्यंत आरोग्य शिबिरांचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करून अनेक गरजू रुग्णांची शस्त्रक्रिया घडवून आणत त्यांना जीवनदान देण्याचे कार्य केले आहे. ज्ञान, विज्ञान अन् अध्यात्माचा या मंदिरात त्रिवेणी संगम आहे. त्यामुळेच मंदिराचा लौकिक जगभरात पसरला आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास, युवक कल्याण व क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळग्रह मंदिरात आयोजित भूमिपूजन तथा विविध उपक्रमप्रसंगी व्यक्त केले.
येथील मंगळग्रह मंदिरात १ जून रोजी (गुरुवारी) श्री कालभैरव, माता श्री जोगेश्वरी व श्री गुरुदत्त यांच्या नियोजित मंदिरांच्या जागेचे भूमिपूजन संत सखाराम महाराज संस्थानचे गादिपती संतश्री प. पू. प्रसाद महाराज, मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी सायरनचे (भोंगा) लोकार्पण, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच पत्रकार व वृत्तपत्र वाटप करणाऱ्या बांधवांना विम्याचा लाभ आदी उपक्रमही राबविण्यात आले. मंत्री श्री. महाजन म्हणाले, की मंगळग्रह मंदिरात येणाऱ्या देशासह विदेशातील भाविकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्या अनुषंगाने मंदिरातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला मिळाला हे माझे भाग्य समजतो. पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता हा समाजातील दुर्लक्षित वर्ग राहिला आहे. अनेक पिढ्या घरोघरी वृत्तपत्र वाटपाचे काम करून उदरनिर्वाह करतात. मात्र, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आजवर कोणीही पुढे सरसावले नाही. मंगळग्रह मंदिराने या घटकाचा सकारात्मक विचार करून त्यांना विम्याचा लाभ मिळवून दिला, ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे.
विधान परिषदेच्या माजी सदस्या स्मिता वाघ, माजी आमदार शिरीष चौधरी, ॲड. ललिता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिलोत्तमा पाटील, भाजपचे धुळे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, धुळे मनपातील स्थायी समितीच्या सभापती किरण कुलेवार, माजी महापौर प्रदीप कर्पे, नगरसेवक सुनील बैसाणे, विधानसभा क्षेत्र संघटक (ठाकरे गट) ललित माळी, युवा सेनेचे हरीष माळी, धुळे मनपातील शिवसेनेचे (ठाकरे गट) विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, नगरसेविका वंदना भामरे, नगरसेवक संजय पाटील, जळगावचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. नितीन बच्छाव, डॉ. अविनाश जोशी, सुभाष चौधरी, अनिल जोशी, धुळे जिल्हा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलेवार, विश्वस्त एस. एन. पाटील, एस. बी. बाविस्कर, गिरीश कुलकर्णी, अनिल अहिरराव, जयश्री साबे, आनंद महाले, राहुल पाटील, आत्माराम चौधरी, धीरज वैष्णव, जयवंत पाटील, संजय विसपुते, आर. जे. पाटील, इंजि. संजय पाटील, सुबोध पाटील, ॲड. प्रदीप भट, सरजूशेठ गोकलानी, प्रा. अशोक पवार, व्ही. व्ही. कुलकर्णी, सुरेश कुंदनानी, लक्ष्मीदास पंजाबी, सत्यपालजी निरंकारी, भगवान पाटील, संदीप पाटील, भरत पवार, योगेश पाटील, जयप्रकाश पाटील, प्रीतपालसिंग बग्गा, ॲड. राजेंद्र चौधरी, दिलीप जैन, उमाकांत हिरे, उज्ज्वला शहा, कल्याण पाटील, सुनील चौधरी, विनोद कदम, अनिल कदम, ॲड. व्ही. आर. पाटील, भागवत सूर्यवंशी, विनोद अग्रवाल, मुन्ना शर्मा, ॲड. महेश बागूल, मदनशेठ सराफ, प्रवीण पाठक, सोमचंद संदानशिव, प्रशांत सिंघवी, योगेश मुंदडे, केशव पुराणिक, ॲड. सुरेश सोनवणे, शीतल देशमुख, नीरज अग्रवाल, महेश कोठावदे, अनिल महाजन, हितेश शहा, भूपेंद्र जैन, प्रतीक जैन, चंद्रकांत कंखरे, प्रताप साळी, प्रकाश मेखा, नरेंद्र निकुंभ, धनगर दला पाटील, संभाजी पाटील, राकेश पाटील, ॲड. भारती अग्रवाल, ॲड. ए. के. बाविस्कर, ॲड. दिनेश पाटील, उदय शहा, समाधान धनगर, नितीन पाटील, हिरालाल पाटील, प्रफुल्ल पाटील, किशोर बागूल, चेतन जैन, जितेंद्र जैन, राजश्री पाटील, श्याम गोकलानी, चंद्रकांत महाजन, रवींद्रसिंग कालरा, प्रकाश शहा, आर. टी. पाटील, रमण भदाणे, ॲड. गोपाल सोनवणे, विशाल शर्मा, दिलीप गांधी, राजू नाढा, रोहित सिंघवी, अनिल रायसोनी आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी, आय.एम.ए. संघटनेचे माजी आंतरराष्ट्रीय खजिनदार डॉ. रवी वानखेडकर व डॉ. निखिल बहुगुणे यांच्या हस्ते सपत्नीक श्री गणेश व श्री विष्णू पूजन करण्यात आले. दरम्यान, या कार्यक्रमाप्रसंगी अमळनेर येथे नव्याने रुजू झालेले पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक विजय शिंदे व अयोध्येतील आर्किटेक्ट सर्वज्ञ चितापूरकर यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील संजय चौहान यांचा मंत्री महाजन यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पत्रकार बांधवांना विमा योजनेचे कार्ड वाटप व शालेय विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात शैक्षणिक साहित्य वाटप झाले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी प्रास्ताविकात मंगळग्रह मंदिरातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तर सहसचिव दिलीप बहिरम यांनी आभार मानले.
महिनाभरात पाडळसरे धरणाचा प्रश्न मार्गी
अमळनेरकरांसाठी जिव्हाळ्याचा असलेला पाडळसरे धरणाचा प्रश्न काही वर्षांपासून निधीअभावी बासनात आहे. मात्र, या धरणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आजच बैठक होत आहे. त्यात सकारात्मक चर्चा होऊन नक्कीच चांगला निर्णय होऊन अमळनेकरांना गोड बातमी मिळेल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. तसेच कापसाला चांगला भाव मिळावा यासाठीही सरकारचे सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
डाव कोणताही असो चीत करण्याची ताकद
लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. लालमातीत कुस्ती खेळताना अनेक डाव शिकलो. खो-खो, कबड्डी, मलखांब यासारखे खेळ आत्मसात केले. त्यामुळे कोणता डाव कसा असतो हे मला चांगले माहीत आहे. राजकारण आणि कुस्ती यात साम्य आहे. त्यामुळेच मी सहा वेळा आमदार झालो. राजकारणातही डाव कुठलाही असला, तरी चीत करण्याची मी ताकद ठेवतो, अशी मिश्किल कोपरखळी मंत्री महाजन यांनी कार्यक्रमात मारली.
सासरवाडीवर माझे विशेष प्रेम : खा. उन्मेष पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव रेल यात्रेच्या माध्यमातून देशातील अनेक धार्मिक स्थळांना पर्यटकांनी भेट द्यावी, या उद्देशाने गौरव यात्रा सुरू केली आहे. यात मंगळग्रह मंदिराचा समावेश झाला आहे. यामुळे येणाऱ्या काळात अमळनेर रेल्वेस्थानकाचा विस्तार होईल. २० वर्षांत जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी अवघ्या १० महिन्यांत सरकारकडून मिळाला आहे. अमळनेर ही माझी सासरवाडी असल्याने या शहरावर माझे विशेष प्रेम आहे. त्यामुळे मंदिराच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.