मंगलवाडी गावच्या पुनर्वसनासाठी लाक्षणिक उपोषण

जळगाव प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मंगलवाडी या गावाचे पुनर्वसन करण्यात यासाठी आज येथील गावकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणीय उपोषण केले.

मंगलवाडी गावाला हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे अनेक अडचणी होत आहेत. गावाच्या तिन्ही बाजूला असल्यामुळे घरांना आरोग्याला धोका निर्माण झाला असून पडझड सुरू झाले आहे. यामुळे भविष्यात जीवित हानी होऊ शकते म्हणून सरपंच धनराज खोत यांनी या गावाचे पुनर्वसन व्हावे याबाबत मागणी सरपंच, ग्राम सदस्य, ग्रामस्थ मंडळी लाक्षणिक उपोषणाला बसले होते.

रावेर तालुक्यातील मंगलवाडी या गावाचे पुनर्वसन व्हावे यासाठी सरपंच व गावकर्‍यांनी मागणी केली आहे. या गावाच्या तिन्ही बाजूने जल फुगवटा असल्यामुळे गावातील घरांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे पडझड सुरू झालेली आहे पुराच्या पाण्यामुळे गावातील जाणार्‍या जनावरांच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पशुधनही बरेच कमी झाली आहे. तसेच गावकर्‍यांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे याची शासनाने त्वरित दखल घ्यावी म्हणून ३५० घरांचे पुनर्वसन करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे. यात आयआयटी पातळीचा अभ्यास वगळून ३५० घरांचे पुनर्वसन शासनाने करावे यासाठी गावाला लागणारी जमीन ही हतनूर उदळी कॉलनीची जागा राखीव होऊन शासनाने आदेश द्यावे, शासनाचे आदेश आदेश करावे पुनर्वसन मागणी पूर्ण झाल्यास घरांची मोजणी होऊन मोबदला त्वरित मिळण्याबाबत आशा मागण्या पत्रकाव्दारे करण्यात आली आहे.

आपली मागणी पूर्ण करण्यासाठी आह २८ रोजी राष्ट्रीय मानवाधिकार महाराष्ट्र उपाध्यक्ष प्राध्यापक संजय मोरे, सरपंच धनराज कोळी, ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी लाक्षणिक उपोषणास बसले आहेत. पुनर्वसनाची मागणी मान्य न झाल्यास येत्या महिन्यात आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा यावेळी मंगळवारी ग्रामस्थांनी आपल्या निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.

Add Comment

Protected Content