रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील मंगरुळ येथील एका दोन वर्षीय मुलाचा कावीड या आजाराने मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.
तालुक्यातील मंगरुळ येथील अर्जुन भिलाला या दोन वर्षाच्या मुलास काविळ झाला होता. त्याला आठ दिवसा पासुन रावेर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु होता. कावीळचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचे वडील रामसिंग भिलाला यांच्या फिर्यादी वरुन रावेर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.